बसलो मी होऊन मग्न तुझ्या आठवणीत, विसरून स्वतःला वाहलो तुझ्या आठवणीत....! वाऱ्याची सरगम ही तुझ्याच रंगात दरवळत आहे, वाहणारी हवा ही तुझेच नाव गुणगुणत आहे...! ओठांवर आलेले हसु तुझ्या आठवणींचा स्वरूप आहे, मिटलेल्या डोळ्यांतही तुझेच अस्तित्व बहरत आहे....! डोळ्यांनी पाहिलेली ती प्रत्येक नजर ही तू आहे, हातांनी केलेला प्रत्येक स्पर्श हा तुझाच आहे...! सगळीकडे दरावळलेला तुझा सुगंध हा माझ्या श्वासात आहे, आणि तुझा झालेला प्रत्येक आभास हा माझ्या हृदयात आहे....!❤️ ©Priti Chaudhari तिची आठवण #Yaari