Nojoto: Largest Storytelling Platform

तसा एकटा मी नव्हतो कधीही जरी साथ काट्यांची होती

तसा एकटा मी नव्हतो कधीही 
जरी साथ काट्यांची होती मला 
ठगले मला ना कुणीही परंतु 
घरात भेटले घरभेदी मला
 
जाहली जरी ना कधी वाटमारी 
फिरला घराचा वासा जरा 
कुणी तोडले ना फुलांसी परंतु 
आपलेच बोचले मनासी जरा
 
लुटणार होतो नारदास जेंव्हा 
कळले मला मी कुणी एक वाल्या खरा 
पापात माझ्या न वाटेकरी ते 
लुटीतच त्यांचा वाटा खरा
 
उरले आता ना ते भावबंध 
झोपडी परक्यांची नको मला 
वादळात सारेच वाहून गेले 
पावसाची कशाला भीती मला
 
बुडाले जेव्हा घरकुल माझे 
आधार काडीचा झाला मला 
बांधण्या शब्दांनी महाल व्यथांचे 
आधार कागदांचा झाला मला
 
अमृत घेउनी ते सर्व पळाले 
ठेवून प्राशण्या हलाहल मला 
वैराग्य माझ्या नशिबात आले 
अन् दिला माणसाच्या गर्दीतल्या
 एकटेपणाचा शाप मला
 
एकटाच होतो एकटाच आहे
कदाचित राहील  एकटाच 
उरले कुणी ना साथी आता अन्
उरणार ना कुणी सोबती आता
आधार खांद्यांचा शोधू कशाला 
एकटेच चालणे नशिबी आता

कडवेपणाने आयुष्य पोळले 
जगण्यात उरली ना गोडी आता 
माझ्या सवेच जळले ते कागद आठवणींचे जेव्हा 
चितेवर तेव्हा लाभली शांती मला

शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #शापीत_आयुष्य
तसा एकटा मी नव्हतो कधीही 
जरी साथ काट्यांची होती मला 
ठगले मला ना कुणीही परंतु 
घरात भेटले घरभेदी मला
 
जाहली जरी ना कधी वाटमारी 
फिरला घराचा वासा जरा 
कुणी तोडले ना फुलांसी परंतु 
आपलेच बोचले मनासी जरा
 
लुटणार होतो नारदास जेंव्हा 
कळले मला मी कुणी एक वाल्या खरा 
पापात माझ्या न वाटेकरी ते 
लुटीतच त्यांचा वाटा खरा
 
उरले आता ना ते भावबंध 
झोपडी परक्यांची नको मला 
वादळात सारेच वाहून गेले 
पावसाची कशाला भीती मला
 
बुडाले जेव्हा घरकुल माझे 
आधार काडीचा झाला मला 
बांधण्या शब्दांनी महाल व्यथांचे 
आधार कागदांचा झाला मला
 
अमृत घेउनी ते सर्व पळाले 
ठेवून प्राशण्या हलाहल मला 
वैराग्य माझ्या नशिबात आले 
अन् दिला माणसाच्या गर्दीतल्या
 एकटेपणाचा शाप मला
 
एकटाच होतो एकटाच आहे
कदाचित राहील  एकटाच 
उरले कुणी ना साथी आता अन्
उरणार ना कुणी सोबती आता
आधार खांद्यांचा शोधू कशाला 
एकटेच चालणे नशिबी आता

कडवेपणाने आयुष्य पोळले 
जगण्यात उरली ना गोडी आता 
माझ्या सवेच जळले ते कागद आठवणींचे जेव्हा 
चितेवर तेव्हा लाभली शांती मला

शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #शापीत_आयुष्य