#आषाढी सरल्यावर.... आषाढी सरल्यावर रिती होई ही पंढरी अन् ओस पडे ते विठुरायाचं रे राऊळ अशी एकाकी का व्हावी एकादशी ll१ll मग नसे तयाठायी हरीनामाचं गुंजन नसे मग तिथे टाळचिपळीचा ब्रम्हवेणुनाद घरोघरी परतसे तेव्हा संचिताचे सुख घेऊनी अमुचा तो राजीयांचा राजा वारकरी ll२ll तुझी लीला म्हणु की म्हणु देवा ही माझी सत्वपरिक्षा सोपान हा दुजा ज्ञानदिप जणु नवा लावतसे सदा तुझ्या आत्मतत्वाचा रे पांडुरंगा ll३ll तुझ्या लेकरात अन् तुझ्यात जाणुन-बुजुन तु ठेवी रे अंतर अंतरीचा विठोबा आम्हास गवसण्या ll४ll फिरूनी नव्यानं भेट होई जव तुझी आम्हा विठुराया प्रत्येक भेटीत तु तुझे विश्वस्वरूप ते सावळे दावतसे ll५ll @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #माझा_विठोबा