प्रजासत्ताक दिन, प्रजेच्या हातात सत्ता आली म्हणे, हुकूमशाही चा हा शेवट होता, लोकशाहीचा हा दिवस गोड तर राजेशाही साठी हा दिवस तिखट होता. जनतेचा खूप शोषण केलं जायचं हा दिवस त्या शोषणाचा अंत होता, आणि शोषण करणाऱ्यांसाठी हा दिवस एक खंत होता. लोक खूप भोळी होती शासनकर्त्याचं सर्व चुपचाप ऐकून घ्यायची, त्यांना कशाचाही अधिकार नव्हता, राजे महाराजे जे सांगतील त्या सर्व गोष्टीचा त्यांना कोणत्याही प्रश्नांनान वीणा स्वीकार होता. पण ह्या दिवसापासून सर्व काही बदलले, राजकर्ते राणीच्या पोटून नव्हे तर प्रजेतूनच जन्मले. पाठी वर चाबूक खाणारी मुल आता पाठी वर दप्तर घेऊन शाळेत जाऊ लागली, आपला आवाज उठवण्याची आज प्रत्येकात ताकद आली, हे अधिकार भेटलेच नसते जर हा दिवसच उजळला नसता, आणि हा दिवसच उजळला नसता जर बाबासाहेबांनी २ वर्षे ११ महिने १८ दिवस जोळून हे संविधान लिहल नसत. संविधान निर्मात्या बाबासाहेबांना आणि माझ्या भारत मातेला माझा कोटी कोटी प्रणाम, 26 जानेवारी हा फक्त दिवसच नाही, तर प्रत्येक नागरिकांचा आहे हा सन्मान. ------- साहिल दिनकर तायडे ©sahil tayde प्रजासत्ताक दिन #sahiltayde #RepublicDay