तान्हुला बाळ घरा येते फिरी दोस्तांची माय पाहून घरोघरी त्याची माय दिसत नाही घरी गेलीय त्यास सोडून देवाघरी मायेचं छत्र नाही डोक्यावरी बाळ हिरमुसून राहे कसातरी डोळी तयाच्या येते दाट सरी समजवेल कोण बाळास परी व्याकूळ नजर फिरे दारोरारी परतुनी येई केविलवाणी घरी बापाचं काळीज फाटते जरी आणेल का त्याची माय तरी मायेविण बाळ अधाशी तिरी सूना आंगण, सूनीच ओसरी जेवतोय बाळ भूक मेल्यापरी जणू वात्सल्याचा तो भिकारी आर्त नाद दाटतो त्याच्या ऊरी बापाची कसोटी आहे ती खरी कवटाळतो त्यास तो वेडापरी बापलेकाची होतेय गट्टी न्यारी प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार.🙏 आजचा शब्द आहे 'व्याकुळ'. भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झालेला आपण पाहतो. शब्दांप्रती तुमची व्याकुळता किती आहे हे पाहूया. आपली व्याकुळता व्यक्त करा गद्य आणि पद्यात. #व्याकुळ1 हे टँग करायला विसरु नका.