निरर्थक..!!! कां निरर्थक वाटत असावं जगणं; का सार्थक होवु नये प्रयत्न..??? भयंकर कारण लागतं जिव द्यायला अन् धाडस ही तसच; असह्य तडफडा होत असावा जिवाचा जेव्हा कळतं आता अटळ मरणं. कां निरर्थक वाटत असावं जगणं..!?! जिव्हाळ्याची व्यक्ती जेव्हा जीव लावणं सोडते; जिवनी मग जीव लागण्यासारखं काहीच उरत नसते. Show Must Go On हे बोलायला-ऐकायला बरं वाटतं क्षणिक; मात्र आरसा फुटल्यावर का प्रतिबिंब पुर्णपणे दिसते. अगदी कागदाच्या बोटीसारखं; जास्त भिजल्यावर बुडणं. कां निरर्थक वाटत असावं जगणं..!?! उमेदी, आकांक्षा, स्वप्न मग पुसट होत जातात; असं होत असतांना परस्परी भावना देखील कमी होतात... समजुन घेण्याची तयारीच़ उरत नसेल नसावी कधीच़; विश्वास ठेवणे... गृहित धरणे... हक्क गाजवणे हे केवळ मिथ्य होऊ पाहतात. स्वरूप बदलता सर्वांच्याच आयुष्यी विधिलिखित भोगणं... कां निरर्थक वाटत असावं जगणं..!?! नैराश्याला तोंड देणे प्रत्येकाला जमेलच़ असे नाही; आणि तो प्रयत्न केलाच नसावा असं ही नाही... जमतं तेवढं करतोच़ की माणूस ऐश्वर्य भोगण्यास; पण ही काही निर्णात्मक सुखाची परिभाषा नाही... स्वार्थ म्हणता येईल अश्या वागण्याला हवं तर; त्या काळ-क्षणी मतीभ्रष्ट काहीच़ सुचत नाही. असं होऊ नये... व्हायला नको; सकारात्मक राहीलच़ पाहीजे..!!! शक्य होत नसेल कदाचित स्वतः साठीतरी स्वतः ला थांबवणं. कां निरर्थक वाटत असावं जगणं; का सार्थक होवु नये प्रयत्न..??? #निरर्थक..!!! . . . #कर्मकवी... Be Ready To FIGHT For What Is RIGHT..!!! Be BRAVE & Be POSITIVE... 🙄🙏🏼😇