कुणी असे अनाहुतपणे जंतरमंतर हे केले ? माझ्या या जगण्याचे अत्तर केले मग तिला पाहता सर्व विसरलो होते जितके मी पाठांतर केले ती डोळ्यांनी बोलत गेली मी नंतर भाषांतर केले ती मौनातुनच बोलत राहीली मी अंतर्मनाच्या शब्दवलयांकीत भाषेत तिचे मौनाचे सुर ऐकले तीने अलगद माझ्याशी स्वतःचे मन जुळवले मी देखील मग तिच्याशी अलवार क्षणी असलेले माझे हृदयांतर मिटवले आली फुलपाखरासम माझ्या सप्तरंगी आयुष्यनभात अशी ती की मी स्वतःला कठीण नियती असतानाही सुवासीक जास्वंद बनवले ©शब्दवेडा किशोर #नाते_हृदयांतरीचे