#कसं कळावं.... रातीस या कसं कळावं तळमळणं माझं एकांतातील या उदास मनाचं जळणं माझं कित्येक आठवणींचा बाजार हा मनी दाटलेला अन् विरह वेदनेत सदा असलेलं हे शापीत होरपळणं माझं रातीस या कसं कळावं तळमळणं माझं एकांतातील या उदास मनाचं जळणं माझं.... तेजधार होऊनच चेतवतो येथे दुःखांचा अंगार मज क्षणाक्षणाला समजावं त्यास कसं धगीतलं ते शेकणं माझं जळता जळता राख होते माझ्या मनाची मजलाही ती कळेना मनही जाणतं हे असं उरलेलं जगणं माझं रातीस या कसं कळावं तळमळणं माझं एकांतातील या उदास मनाचं जळणं माझं.... सांगावं कुणा हल्ली बोलावं मी कुणाशी बहुदा वेगळेच होऊ लागलंय अस्तित्व हे माझं रातीस या कसं कळावं तळमळणं माझं एकांतातील या उदास मनाचं जळणं माझं.... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #माझ्या_मनातलं_वादळ