जमला वैष्णवांचा मेळा नाथ नाथ म्हणती कैक वेळा वारकरी सारे झाले येथे गोळा असा माझ्या नाथांचा सोहळा।। षष्ठीनिमित्त भाविक येति गावा नाथ नामात तेव्हा रंगुनी जावा षड्रिपु गोदावरीत प्रवाहित करावा अध्यात्म ज्ञान घेऊनि जावा।। पांडुरंगाने भरले पाणी नाथांच्या घरी, श्रीखंडी रूपानी असा थोर संत माझा सारे एकनाथ एकनाथ म्हणती।। भेदाभेद संपवण्याचा प्रयत्न केला अस्पृश्यांना माणूस म्हणून संबोधीला गोदावरीत 108 वेळा स्नान केला असा माझा नाथ, विठुचा लाडका झाला।। #संत #एकनाथ YourQuote Taai