अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे लागते बेगड्या या दुनियेत आहे जो तो इथे स्वार्थी त्यातच आपले, परके कोण शोधावे लागते का उगाच गुंततो वेडा जीव नित्य आशेवर पारखतांना स्वतःलाच विस्कटावे लागते नसतेच दरवेळी जीवनाची वाट मखमली बोचले काटे पायात तरी पुढे चालावे लागते एकच शाश्वत सत्य आहे जगण्याचे कैलास सुगंधासाठी आधी स्वतःला झिजवावे लागते अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे लागते बेगड्या या दुनियेत आहे जो तो इथे स्वार्थी त्यातच आपले, परके कोण शोधावे लागते