#भेट भेटीची ती उत्कट आस लागता उरी मनाने कशी साहावी ही आपल्यातील दूरी सखे तुझ्या प्रेमाने चिंब चिंब मी होतो का कळेना तुला गं सुखबहर माझ्या जीवनास तुझ्यामुळे येतो तूझी साथ सुखाची त्यात पावसाची बरसात कळी उमलून येई मनी माझ्या आपल्या प्रित भेटीची असे तुझी साथ सोबत तेव्हा प्रेमाची क्या बात आहे साथीला अन् सोबत थोडासा फरक आहे नजरेचा पूर थांबेलही हृदयात त्याचा बांध आहे मन माझे हे इवलेसे नकळे मज कधी तुझे झाले तुझ्या येण्याने आयुष्यात इंद्रधनू रंग फुलून आले तुच तर आता एक माझ्या मनीची आस आहे नाही तर बाकी सगळा मजला जगीचा बहुधा आभास आहे अंतरीचे तु न सांगता सखे जाणून घे संपतील सारे दुवे लवकरच कर थोडी प्रतिक्षा अजुनी मिलनास आता अत्यल्प वेळ आहे दुराव्यातच आता जरा सुख मानुन घे........ सखे मज नकोय तुजकडून चंद्रतारे अन् नको ते फुकाचे प्रेम जाळ्याचे निराळे पसारे कधीतरी मनमीत बनुनी न सांगता भाव मनीचा जाणून घे जराशी कळ सोस दुर राहण्याची आहे वाट्याला आलेला हा दुरावा तर दुराव्यातच तु अजुन जरासा काळ सुख मानुनीया घे........ हदयी नवी ज्योत जागव लेखणीस तुझ्या मी सोबत नसतानाही धारदार बनव घे श्वास नव्याने अन् मी अस्तित्वात तुझ्या नसतानाही पुढं चालायची जिद्द उरात धगधगती ठेव नव्यानं प्राजक्तासम तु हररोज मजशिवाय बहर घे दुराव्यातच तु अजुन अल्प काळ सुख मानुनीया घे........ @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #दुरावा_तूझ्या_माझ्यातला