खरच पहिल्या सारखं आता काहीच राहील नाही.. माणसं बदलली माणुसकी बदलली .. आपल्या सोयीनुसार वागु लागलय.. चांगुलपणा चां मुखोठा घालून, खोटेपणाचा मोठेपणा दाखवु लागलय.. Ego.. Attitude..Selfish रोग जणू पसरलय कोरोना पेक्षा घातक आता हेच वाटु लागलय स्वार्था साठी आता प्रत्येक नात जुळु लागलंय ढाल समजतोय ज्याला आता तोच पाठीत खंजीर खुपसू लागलंय. माणुसकीच्या रंगात आता जाती-पातीच रंग मिसळु लागलंय... पैशाच्या लोभे पोटी आता रक्ताच नातंही फिक पडु लागलंय.. माणुस म्हणुन जनावरांसारख वागु लागलंय.. रंग बदलण्यात सरड्याला ही माग टाकु लागलंय.. आयुष्याच्या वाटेवर एकमेकांचे पाय ओढू लागलंय.. दुसर्याच्या चुका शोधण्यात आपले कर्म विसरू लागलंय.. जिवन-मरण या श्रखंलेत आता माणुसच माणुसकीच अंत करू लागलंय.. लेखक / कवी अशपाक तालीकोटे #MarathiKavita #marathi #manus #HeartBook