Nojoto: Largest Storytelling Platform

पूल... नदीच्या पुलास नव्यानेच पहिले ध्यान माझ

पूल...


नदीच्या पुलास 
 नव्यानेच पहिले
 ध्यान माझं सारं 
      सांधण्याकडेच राहिले

वर्षानवर्षं सावरत
   ओझं किती जणांचे
  किलो असो किती
वा असो मणांचे

     तक्रार नाही कधी
ना कधी खंत
         समानतेचा वसा देई
 जणू असे संत

उभा ऊन पावसात
होत राहील जर्जर
    लक्ष कधी गेलंच नाही
   आज नयनांना पाझर

वाटलं आपणही मना
मनाचा पूल बांधावा
     सांधला नाही जो कोपरा
      त्याच्या मदतीने सांधावा. पूल...
पूल...


नदीच्या पुलास 
 नव्यानेच पहिले
 ध्यान माझं सारं 
      सांधण्याकडेच राहिले

वर्षानवर्षं सावरत
   ओझं किती जणांचे
  किलो असो किती
वा असो मणांचे

     तक्रार नाही कधी
ना कधी खंत
         समानतेचा वसा देई
 जणू असे संत

उभा ऊन पावसात
होत राहील जर्जर
    लक्ष कधी गेलंच नाही
   आज नयनांना पाझर

वाटलं आपणही मना
मनाचा पूल बांधावा
     सांधला नाही जो कोपरा
      त्याच्या मदतीने सांधावा. पूल...