दुःखाचे डोळ्याशी करार झाले अश्रू वाहुनी नयन बेजार झाले कोंब फुटले मुक्या भावनाना बोल तुझे जेव्हां आधार झाले खोल जख्मा तू दिल्या काळजाला अबोल शस्त्र नजरेचे वार झाले फुंकर मारुनी केलास घात तू गोड्या पाण्याचे आता क्षार झाले काळरात्री त्या बुडली माझी होडी विझला "दीप"जीवन अंधार झाले ©Deep bawara #गजल #मराठीगजल #मराठी #NationalSimplicityDay