ज्या वाटेवर उमटल्या तुझ्या पाऊलखुणा त्याच वाटेवर शोधते मी हरवलेल्या क्षणा काळजात साठवल्या गोड तुझ्या आठवणी आठवताच डोळ्यात दाटून येते पाणी सोडून एकटीला तू गेलास निघून दूर मनात माझ्या दुःखाचे हे माजले काहूर तुझ्या पाऊलखुणा तू सोडल्यास मागे कसे अचानक तुटले हे प्रेमाचे रेशीम धागे तुझ्या विरहात सख्या मी दिनरात झुरते बघून पाऊलखुणा तुझ्या परतण्याची प्रतीक्षा मी करते Open for collab 🌹प्रतियोगिता_७६_मराठी आपले पोस्ट share highlight करायला विसरू नका 😍 शुभ संध्या मित्रहो 💞😊 #प्रतियोगिता_७६_मराठी #marathikavita #marathi #मराठी #marathiqoutes #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी