सखी असावी तुझ्यासारखी सदैव उत्साहात राहणारी.. मनमोकळेपणाने बोलणारी.. हसतमुखाने राहणारी.. चेहरा बघताच मनातील दुःख ओळखणारी.. मनावरील दडपण दूर करणारी .. सखी असावी तुझ्यासारखी सुखात भावनांस कंट्रोल करणारी, चुकल्यावर हक्काने ओरडणारी संकटात स्वत:हून आधार बनणारी.. सगळ ठीक होईल म्हणत भरवसा देणारी.. सखी असावी तुझ्यासारखी प्रेमाने मजवर जीव लावणारी, सोडून गेले कितीही अर्ध्यावर तरी जन्मभर मज बरोबर साथ असणारी .. सखी असावी तुझ्यासारखी...