Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याचं असं होतं.. वाहून गेलेल्या पाण्यासारखं व

आयुष्याचं असं होतं..

वाहून गेलेल्या पाण्यासारखं
वय कसं निघून जातं..
जगून घेईन म्हणत म्हणत
आयुष्य किनाऱ्याला येतं..

चुरगाळलेल्या फुलासारख्या
भावना विरून जातात..
मागे वळून पाहताना
डोळेही भरून येतात..

ऋतुपरत्वे झाडाची
पानं गळू लागतात..
ऊन वाऱ्याच्या झळा
आपसूक कळू लागतात..

भूतकाळाकडं बोट करून 
रडताही येत नाही..
अन् चुकलेलं गणित
खोडताही येत नाही..

पार शेवटच्या वळणावर
जाणीव खोल होते..
जणू ओस माळरानात
बहरायची सल राहते..

                    @kganesh
                      ९०२८११०५०९ आयुष्याचं असं होतं..
आयुष्याचं असं होतं..

वाहून गेलेल्या पाण्यासारखं
वय कसं निघून जातं..
जगून घेईन म्हणत म्हणत
आयुष्य किनाऱ्याला येतं..

चुरगाळलेल्या फुलासारख्या
भावना विरून जातात..
मागे वळून पाहताना
डोळेही भरून येतात..

ऋतुपरत्वे झाडाची
पानं गळू लागतात..
ऊन वाऱ्याच्या झळा
आपसूक कळू लागतात..

भूतकाळाकडं बोट करून 
रडताही येत नाही..
अन् चुकलेलं गणित
खोडताही येत नाही..

पार शेवटच्या वळणावर
जाणीव खोल होते..
जणू ओस माळरानात
बहरायची सल राहते..

                    @kganesh
                      ९०२८११०५०९ आयुष्याचं असं होतं..