#मन घायाळ घायाळ तुझ्या प्रेमात घायाळ... मन घायाळ घायाळ प्रेम रंगात घायाळ आठवणी चांदराती जीव होई हो मवाळ तुझ्या प्रत्येक शब्दांना गुंफले मी आठवणीत तुझ्या नाजूक हास्याने घायाळ केले तनमन चाली रस्ता व्यापत जणू बाग हा फुलला तिच्या रोजच्या स्वागता सनई चौघडा वाजला कानी आवाज येता कान नाचे आंगणात तिच्या वेगळ्यापणाची भुरळ साऱ्या जगात तुझ्या ओजस्वी रूपाने सूर्यचंद्रही लाजे तुझ्या सोनेरी रुपावर सारे जग फिके पडे पाऊले पडल्यावर सजे सुरांची मैफिल आनंदी होऊन गाई तुझ्या कौतुकाचे गाणे तुझ्या हळव्या रूपाने मन जाई भारावून तुझा प्रेमळ स्वभाव विशाल नभाला रडवी मन ओले ओले चिंब तुझ्या प्रेमाने झालेया रोजच्याच रात्री स्वप्न तुझे मी पाहिले मन घायाळ घायाळ प्रेम रंगात घायाळ आठवणी चांदराती जीव होई हो मवाळ....... -अतिश शेजवळ.. #मन घायाळ घायाळ तुझ्या प्रेमात घायाळ