गझल मंथन साहित्य संस्था, कोपरणा आयोजित 'एक दिवसीय मराठवाडा विभागीय गझल मुशायरा' अंबेजोगाई, जि. बीड येथे आयोजित संमेलनात सादर केलेली माझी एक गझल... दि.७ एप्रिल २०२४ गझल हवा कशाला एक शेर वा केवळ मतला... मांडत जाऊ गझलेमधुनी भाव आतला! गर्भ पाडता प्रमाण झाले कमी मुलींचे... चिंता आता यावी मुलगी घरी सातला! हिटलरशाही ज्यांनी केली झाली माती... नियतीही गाडत जाते जो उगा मातला! प्रत्येकाने जबाबदारीने वागावे... अखेर हिस्सा आहो आपण समाजातला! फंदफितुरी प्रथाच जाहली आहे हल्ली... नवखे नाही पहा दाखला पुराणातला! जयराम धोंगडे ©Jairam Dhongade #GateLight