काळोखी रात्र आहे... तरी चांदण्यांची साथ आहे.. निरव शांतते सोबत मंद वारा गात आहे.. तुझी सोबत आणि, हाती तुझ्या माझा हात आहे. निशब्द मी आहे... निशब्द तू आहेस. तुझ्या डोळ्यातील प्रेमळ भाव.. घेतो माझ्या मनाचा ठाव आहे. उजळू लागलाय हळू हळू तो चंद्र ही.. जो आपल्या नात्याचा साक्षीदार आहे.. तू आणि मी जेव्हा असे एकांतात भेटतो.. तेव्हा असे वाटते... आज पहिल्यांदाच आपण भेटतोय.