आजही मला ते सर्व आठवतयं, जणू कालचं सारे घडल्यासारखं तिच आयुष्याची मजा घेत, मित्रांच्या सहवासात रमल्यासारखं अजुनही मला आठवतंय, Lecture ला दांडी मारुन Canteen मध्ये जाऊन बसायचो पुढच्या Lecture ला मात्र परत Class कडे वळायचो Canteen मध्ये कधी कंटाळा आला तर बाहेरच्या Hotel मध्ये जायचो Hotel बंद असलं की परत Canteen मध्येच येऊन गिळायचो.. Library card चा तसा कधी उपयोग झालाच नाही Notes चा साठा जास्त असल्याने Library कडे कधी वळलोच नाही.. Boring तासाला मागच्या बाकावर मोबाईलवर Chatting करत बसायचो, तास संपल्या नंतर एक डुलकी घेऊनचं उठायचो.. परिक्षेची Date आली कि मनात एक प्रकारची भिती असायची, पेपरची तयारी मात्र आदल्या दिवशीचं करायची.. Traditional Day मध्ये DJ लावुन नाचायचो, Class मध्ये सरांनी प्रश्न विचारले कि खाली मान घालुन गप्प बसायचो, खुप आठवतात ते दिवस, सोबत रडलेलो क्षण आठवले की आज अगदी हसायला येते, पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की, डोळ्यात टचकन् पाणी येतं.. College Life