#स्पर्श वेदा हल्ली कुणाशी बोलायला मागत नव्हती.नेहमी आईबाबांबरोबर खूप गप्पा मारणारी वेदा गप्प गप्प राहू लागली होती. वेदाचा वाढदिवस जवळ आला होता.तरी तिने आईबाबांकडे काही मागितलं नव्हतं.बाबा नेहमी ऑफिसला जायचे व रात्री उशिरा घरी यायचे.वेदाची आई, वेदा दुपारी शाळेतून घरी आली की तिला जेवण वाढायची.मग तिला झोपवून देवळात जायची,ती पाच वाजेपर्यंत घरी यायची.त्यानंतर वेदाचं चहापाणी,अभ्यास वगैरे घ्यायची. पण अलिकडे वेदाचा एक चुलत काका त्यांच्याकडे काही कामानिमित्त रहायला आला होता.वेदाची आई वेदाला तिच्या काकाकडे सोपवून देवळात जायची.तिथे त्यांच्या भजनीमंडळाचा सराव चाले.