हाक रसिक भावाला माझी हलगी बोले ढोलकीला कस वाचवू या भुकेल्या कलेला।।धृ।। पारंपरिक लावणीचा केला ठुमका कलाकाराच्या पोटी पडला बसका महागाईने मारला खिशाला धसका नकलाकाराच्या नरडी पडे हिसका महामारीन तुणतुण्याचा नाद थंडला।।1।। सरकारपुढं मांडतो कलेचं गाऱ्हाणं महाराष्ट्रला शाहिरी परंपरेचं वाण घुसमटलेल्या कलाकाराची आन कलाकारांस द्या पोटभर भोजन पोटभरण्या द्या पैका ह्या वक्ताला।।2।। श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले मो.नं.9325584845 #हाक #Forest