Nojoto: Largest Storytelling Platform

कोकणी पाऊस(लेख 👇) बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अ

कोकणी पाऊस(लेख 👇) बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अंजनवेलला जाण्याचा योग जुळून आला.सात ते आठ तासांचा प्रवास जवळपास अकरा तासांचा झाला.दोन वेळा फेरीबोटचा प्रवास केला.मज्जाच मज्जा आली.वातावरण जरा ढगाळ होतं. आभाळ नि समुद्र पांढऱ्या रंगात एकरूप झालं होतं.फोटोमध्ये समजतच नव्हतं आभाळ कुठलं आणि समुद्र कुठला.
संध्याकाळी पाच साडेपाचला पोचलो एकदाचे अंजनवेलला.मामाच्या घराच्या अगदी समोर समुद्र आहे, पाहिलं तर ओहोटी. झाडाचं पानही हलत नव्हतं.वानरं मात्र या आंब्याच्या झाडावरून त्या आंब्याच्या झाडावर तुटून पडली होती. प्रथमदर्शनी मला भीती वाटली कारण मी अंगणात बसले होते , हातात फोन.घेऊन गेला तर ? माझा भाऊ म्हणाला, "ताई ते स्मार्ट आहेत ते फक्त आंब्याच्या मागे असतात बाकी त्यांना पडली नाही." 
वासरं इथून तिथं शतपावली करत होती
म्हणता म्हणता अंधार पडला.जेवण झाले.थोडावेळ गप्पा मारल्या.अकरा तासांच्या प्रवासाने फारच थकवा आला होता.गाडीत मागच्या सीटवर बसून मणक्याची रिअरेंजमेन्ट झाली होती. बसल्या बसल्या वाटत होतं की अंजनवेलला नाही मी गोव्याला जाऊन पोहोचले इतकी डोकं गरगरत होतं.सर्वांचा बिछाना अंथरला.मी पडल्या पडल्या झोपले.मध्यरात्र झाली लाईट गेली.अंधारच अंधार पसरला.तरीही मी झोपले, थकवा प्रचंड होता.थोड्या वेळाने घरावरती कुणीतरी जोराने पाणी टाकत आहे असा भास झाला.प्रचंड अंधार असल्यानं पहायची हिंमत झाली नाही, बाहेर जाऊन पहायला काय झालं नेमकं.. काहीवेळानं ओल्या मातीचा सुगंध दरवळला तेव्हा समजलं माझा सखा बरसला.मुसळधार पाऊस बरसला.माझा आनंद गगनात मावेनासा झाला. माझी ही पहिलीच वेळ, कोकणात पाऊस अनुभवण्याची. भिजण्याची हौस पूर्ण नाही झाली परंतु कोकणाच्या मृदगंधात गंधाळण्याची मज्जा काही और होती.
--प्रेरणा

#yqtaai #marathi #marathiwriter #marathilove