गांधीजी तुमची गरज आहे या वक्ताला नव्याने मार्गदर्शन करा संघ भक्ताला।।धृ।। अजूनही धुमसतोय राग तुमच्यावरला आता घराघरात तुमचा मारेकरी शिरला कधी टीव्ही वरून,कधी वर्तमान पत्रातून कधी मालिकेतून , कधी मोबाईल मधून सगळीकडे अनितीचा डोंगर साचला।।१।। सत्य अहिंसा सत्याग्रह हे मंत्र बोथट झाले नित्यशिक्षणातून अर्धवाटांनी नामशेष केले अर्थहव्यासापायी लोक स्वाभिमान विसरले व्यापारी- सत्ता राजकारण समीकरण बनले तुमच्या तीन माकडाचे इंगित सांगा देशाला।।२।। गांधीजीची गरज