वाचले होते,हरवलेलं मन म्हटले की असेच घडते, भास होतात तिचे,आठवणीत तिच्या मन रमते. वाटत असते सतत मनास,अंतर नसावे कधीही दोघांमध्ये, काहीच सुचत नाही तिच्याशिवाय,तिचेच विचार मनामध्ये. एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा असेच होते, करायचे असते जे ते राहून वेगळेच काही घडते, बावरते मन हे तेव्हा,जेव्हा ती समोर येते, पाहता तिला खरंच,काय करावे काही सुचत नसते. म्हणतात ज्याला प्रेम कदाचित ही त्याची सुरुवात असावी, का वाटते मनास,नजरेसमोर सतत तीच दिसावी. एकांत नसावा कधी ही,क्षणभर ही ती दूर नसावी. सतत दिसावी समोर,नेहमीच माझ्या अवतीभवती असावी. नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... हरवलेेलं मन तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील