डिसेंबरच्या काही आठवणी सुखद तर काही आठवणी दुःखद आहेत. कधी नव्हे ते ह्या वर्षी घडले होते 4 डिसेंबर ला मुलीचा वाढदिवस साजरा करताना हा योग आला. रात्री 11च्या सुमारास मेहुनीच्या दोन्ही मुलीचं घरी येण्याचा योग आला. आनंद साजरा करण्याचा वेग द्विगुणित झाला, कारण मेहुनीच्या एका मुलीचा वाढदिवस ही ह्याच दिवशी असतो. म्हणून दोघींनी एकत्र येऊन केक कापला. ह्या सुखद अनुभवाबरोबर एक दुःखद अनुभव ही आला, चांगला वयात आलेला मुलगा वडिलांच्या ओरडण्यामुळे रागावून आत्महत्या करून गेला. वडिलांनी चांगलेच समजावले मद्यपान वाईट असते इतकेच सांगितले होते. फरक फक्त इतकाच होता की ओरडताना मुलाचे मित्र संगती होते, म्हणून मुलाला ते शब्द खूप लागले होते. सर्वांना माझा नमस्कार🙏😊 वर्षाचा प्रत्येक महिन्यात आपल्या काहीना काही आठवणी असतातचं. आता डिसेंबर संपत आलाय वर्ष सपतयं. मग या डिसेंबर च्या काही आठवणी लिहा. #डिसेंबर2020 हे टँग करायला विसरु नका आणि लिहीत राहा.😊