White मित्र मैत्री साधा धागा नाही... गाठ पडाया जागा नाही! सूत पोत अन् रंग बघाया... मित्र तसाही तागा नाही! चिडकी तर रक्ताची नाती... मैतर म्हणजे त्रागा नाही! बितंबातमी ठेवत असतो... कसा म्हणू तो जागा नाही! नाही कोणी मित्र जयाला... त्यासारखा अभागा नाही! जयराम धोंगडे, नांदेड ©Jairam Dhongade #international_youth_day मराठी शायरी मैत्री