Nojoto: Largest Storytelling Platform

कधी कधी वाटतं... कर्तव्यापासून भावनांची कधीतरी फा

कधी कधी वाटतं...

कर्तव्यापासून भावनांची
कधीतरी फारकत असावी,
अन् मनासारखं जगायला
स्वतःचीही हरकत नसावी..

रस्ता दिसेल तिकडं
पाऊलासंगे चालावं..
अन् वाटेतल्या झाडाला
थोडं मनातलं बोलावं..

गर्द झाडाच्या सावलीत
वाटतं एकट्याने बसावं..
अन् झाडाच्या फांदीवर
पाखरू सोबतीला असावं..

मनाला पंख लावून
खुशाल उडू द्यावं..
रोजच्या दगदगीतून
मनासारखं घडू द्यावं..

स्वप्ना मागे धावताना
कधीतरी नियम मोडावा..
पाना फुलांचा आनंद
इथं जगण्याशी जोडावा..

मातीच होते शेवटी
कमावलेल्या धनाची..
उणीव फक्त राहते
गमावलेल्या क्षणांची..!
                   copyright @kganesh
               9028110509 मन पाखरू
कधी कधी वाटतं...

कर्तव्यापासून भावनांची
कधीतरी फारकत असावी,
अन् मनासारखं जगायला
स्वतःचीही हरकत नसावी..

रस्ता दिसेल तिकडं
पाऊलासंगे चालावं..
अन् वाटेतल्या झाडाला
थोडं मनातलं बोलावं..

गर्द झाडाच्या सावलीत
वाटतं एकट्याने बसावं..
अन् झाडाच्या फांदीवर
पाखरू सोबतीला असावं..

मनाला पंख लावून
खुशाल उडू द्यावं..
रोजच्या दगदगीतून
मनासारखं घडू द्यावं..

स्वप्ना मागे धावताना
कधीतरी नियम मोडावा..
पाना फुलांचा आनंद
इथं जगण्याशी जोडावा..

मातीच होते शेवटी
कमावलेल्या धनाची..
उणीव फक्त राहते
गमावलेल्या क्षणांची..!
                   copyright @kganesh
               9028110509 मन पाखरू