Nojoto: Largest Storytelling Platform

प्रिय डिसेंबर, मला तुला काहीतरी सांगायचे आहे, सांग

प्रिय डिसेंबर,
मला तुला काहीतरी सांगायचे आहे,
सांगशील का जरा तुझ्यात असे काय आहे की तू आल्यावर तुझा खूप उदो उदो होतो,
तू सुद्धा इतर महिन्यांसारखाच आहेस ना जशी तुला ३१ तारीख आहे तशी इतर ही महिन्यांना आहे पण नेमके तुझ्या ३१ तारखेच्या दिवसाला का आनंद साजरे करतात ? पुढे आपण काय करावे काय करू नये ह्याची आखणी का करतात.
मला तर तुझ्याबद्दल थोडा रागच येतो कारण दर महिन्याला month ending म्हणून दोन-तीन दिवस काम जरा जास्त असते पण तू शेवटचा महिना असल्यामुळे   
Year ending म्हणून काम दुप्पट होऊन जाते,आणि ह्या दुप्पट कामामुळे कधी कधी ख्रिसमस ची सुट्टी जी हक्काची असते रद्द होते.
सर्वात वाईट वाटते ते तू जाणार म्हणून आनंद साजरा करण्यासाठी बाहेर फिरायला गेलेले काही जण अतिउत्साहा मुळे आपला जीव ही गमावतात,
तू जाणार म्हणून १५ दिवस अगोदर पासूनच काही जण ह्या वेळेस काय प्यावे,कुठे प्यायला जावे हे प्लॅन करतात त्यातले काही तर असे असतात जे नेहमीच पितात पण ३१ डिसेंबर ची गोष्टच वेगळी म्हणतात.
प्रिय डिसेंबर , प्रिय ह्या साठी की ह्या महिन्यात शेवटच्या दिवशी माझ्या आईचा वाढदिवस असतो जो आमच्या साठी खूप आनंदाचा दिवस असतो दुसरं म्हणजे तुझ्या शेवटच्या दिवसमुळे आम्हाला दुसऱ्या दिवशी सुट्टी असते.
बाकी खास काही नाही बस तू माझ्या साठी इतर महिने आणि दिवस आहेत तसाच आहेस.
राग मानू नये तुला जायचे आहे तू जाणारच,
टाटा,बाय बाय.. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
नव वर्षाच्या स्वागता ची तयारी कशी सुरुय?
काही नवीन योजना केल्या की नाही?
चला तर मग आज आपल्या प्रिय डिसेंबर बद्दल बोलुया.
प्रिय डिसेंबर
मला तुला काहीतरी सांगायचंय.
#डिसेंबर2019