देह मायेचा झिजला फाळ नांगराचा शिरे काळजात आरपार देह मायेचा झिजला तेंव्हा पिकलं शिवार ||१|| माती ढेकळाची होई रानं मऊसर दिसे बैल जुंपू पांभरीला मुठ चाड्यावर हसे ||२|| मागे किडे खाण्या येती फौज घेऊन बगळे बाळ झोक्यातून पाहे कसे? राबती सगळे ||३|| औत हाकता म्हणतो सर्जा राज्याची हो गाणी संगे शिवार डोलता नभ गाळतो रे पाणी ||४|| गेली दमून सांजेला पळ काढती घराला रानं निजले काळोखी दाणे अंकुरे तासाला ||५|| काळ्या मायेची ही कुस सुख घालते जन्माला नको घाबरू तू धन्या! आला बहर तुऱ्याला ||६|| कवी पंडित निंबाळकर मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहमदनगर ७९७२५२३७१७ ©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar #poem #shetkari #sheti