डोळे भरून आले पण कारणच माहीत नव्हते. आपण कधीच कोणाचं वाईट करत नाही चिंतत नाही. कोणाचं वाईट व्हावं असं कधीच आपल्याला वाटत नाही मग सगळ्यात जास्त वाईट माणसं आपल्याच वाट्याला का बर येतात! हसावे की रडावे हेच कळत नाही कधी कधी पण नंतर असं वाटतं की जे झालं ते चांगलच झालं. देव आहे तो सगळं छान करेल. पण तरीही मनात कुठेतरी प्रश्न उपस्थित होतो. शंका येतात. की हेच ते लोक आहेत ज्यांच्यासाठी आपण कधी काळी खुप महत्वाचे होतो. आणि आता चक्क अनोळखी झालोय किती वाईट वाटत ना! पण तरीही आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. लोक वाईट वागतात म्हणून आपणही वागायचं नाही. शेवटी जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर या ओळीप्रमाने जसे कर्म कराल तशी त्याची फळं देव देतो आणि ते भोगावं लागत. #वसू #मनातलेवादळ #मनातलंमाझ्या #माझेमन #माझेशब्द