ती होतीच तशी जगावेगळं तीच सौंदर्य होत मनमोकळं तिचं वागणं होत माझं ती पाहिलं प्रेम होतं पण तिला माहीतच नव्हतं दिलखुलास वावरायची मनसोक्त जगायची माझं तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष होत पण तिला माहीतच नव्हतं सोज्वळता तिच्या चेहऱ्यात होती समंजसपणा तिच्या वागण्यात होता प्रामाणिकता तिच्या शब्दात होती तिचे सर्व सर्व गुण मी जाणून होतो पण तिला माहीतच नव्हतं बेधकड तिचं बोलणं होतं अनोळखी असो का ओळखीचा प्रत्येकाला सारखंच मोल होतं थोडी तिखटच होती पण मला गोड वाटायची तरी तिला माहीतच नव्हतं निष्पाप मनाने तिला बघितलं होत वय काय होत ते होत जेव्हा प्रेम काय असते हे माहिती नव्हतं तेव्हा तिला पसंत केलं होतं पण तिला माहितच नव्हत तिला माहीतच नव्हतं कारण माझ्यात हिम्मतच नव्हती प्रयत्न केले असते पण मला सर्व माहीत होतं ती जशी होती तशीच छान होती आणि माझी पसंत होती आणि खरच तिला माहितीच नव्हतं ती होतीच तशी जगावेगळं तीच सौंदर्य होत मनमोकळं तिचं वागणं होत माझं ती पाहिलं प्रेम होतं पण तिला माहीतच नव्हतं दिलखुलास वावरायची मनसोक्त जगायची