Nojoto: Largest Storytelling Platform

गझल लवंगलता 8 8 8 4 अन्यायाचे वार झेलणे सोपे नसत

गझल
लवंगलता 
8 8 8 4

अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते काही 
कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते काही 

दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी 
गीतेची त्या शपथ घालणे सोपे नसते काही 

भेट कधीतर तू स्वतःला किंमत बघण्यासाठी 
कळेल तेंव्हा जीवन जगणे सोपे नसते काही

काम पाहुनी व्यापारी तो हिशोब मांडत असतो
स्वार्थासाठी गोड बोलणे सोपे नसते काही

केवळ सुंदर दिसण्यासाठी शृंगार पुरे असतो
वास्तवतेचे दर्पण बघणे सोपे नसते काही

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल्हा:- सोलापूर

©Smita Raju Dhonsale
  गझल
लवंगलता 
8 8 8 4

अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते काही 
कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते काही 

दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी

गझल लवंगलता 8 8 8 4 अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते काही कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते काही दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी #मराठीशायरी

89 Views