Nojoto: Largest Storytelling Platform

घे तू श्वास मोकळा,अंतरी जो कधीचा दाटला तुझ्या नव प

घे तू श्वास मोकळा,अंतरी जो कधीचा दाटला
तुझ्या नव प्रवासाला, सूर्य बघ हा थांबला
तू चालता वाट चाले,डगमगता मग तीही थांबे
आता घे भरारी पुन्हा,नभ बघ तुलाच खुणावते 

तू सांभाळते कूस तुझी,परी त्यांची रित न्यारी 
 सुख तुझे बघ आता,लागे त्यांच्या जिव्हारी
जन्म नव्हे सोपा,ह्या स्त्रीपणाच्या जाणीवेचा
दे सोडून व्यर्थ मिथ्या,कर सोहळा तुझ्या जगण्याचा 

तू रडलीस,तू हारलीस,न कळे कुणा तुझी व्यथा
तुझ्या जन्माला कोसतो, तो समाज देवभोळा
ज्यांना न कळली कधी, स्वप्रवासाच्या उगमाची
अंधारलेल्या गर्भाची कथा.........पूनम. जन्म