गोष्ट खूप ही जुनी,शाळेत असतानाची, मैत्रीण होती माझी,कविता नावाची. मैत्रीण ही कविता,खरंच खूप विनोदी होती. माझ्यावरही लिहिणा कविता,नेहमीच मला म्हणायची. लिहिली जरी कविता,खोड त्यात काढायची. विनोदी ही कविता,नेहमीच विनोद करायची. स्वतः ही हसायची,इतरांनाही हसवायची. विनोदी ही कविता,म्हणूनच मला आवडायची. गंभीर कधी तिला पहिलेच नाही,अशी मस्त मजेत राहायची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेतचं असाल हो ना? आजचा विषय आहे विनोदी कविता... चला तर मग चारोळी किंवा कविता करा. #विनोदीकविता हा विषय Savita BK यांचा आहे.