*कौतुक* कधी कधी कौतुक करणे गरजेच असतं | कोणाच्यातरी आयुष्याला वळण मिळत असतं || कौतुक करणाऱ्याचा देखील मोठापण असावा लागतो | व्यक्तीच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा प्रकार असतो|| भरकटलेल्या वाटेवरची माणसं कौतुकाने पुढे आली | यशस्वी होण्यासाठी कौतुकाची थाप मात्र कामी आली || आवडलेल्या गोष्टींना प्रतिसाद देणे मात्र साथ प्रेरणा असते| कोणाच्या तरी आयुष्यात उजाळा पुण्याहून कमी नसते || कौतुक शब्द जरी छोटा असला मन आभाळासारखे असावे लागते | कौतुक केल्याने कोण कुठे पोहोचेल हे भाकित नसते| टिकाची गाठोडी तर सगळ्यांकडे भरलेली असते | चेहऱ्यावर आनंदी पाहाण्यासाठी कौतुक करायला शिकायचे असते|| - ✍️Shital K. Gujar✍️ नमस्कार, प्रसंगानुरूप मला हा विषय घेऊन लिहिले🙏 #yqdidi #yqbaba #yqquotes #कौतुक #प्रसंग