Nojoto: Largest Storytelling Platform

#सांग विठ्ठला पावसाला.... भोळ्या कुणब्याचा जीव आत

#सांग विठ्ठला पावसाला....
 भोळ्या कुणब्याचा जीव आता कंठाशी रे आला
सांग जरा विठ्ठला तू त्या लपलेल्या पावसाला
कृपा करील तो मेघ होती मनाशी या आस
मृग चालला संपून मावळले आता सारे भास
उदासल्या त्या वावरात खेळ खेळे पाला पाचुळा
सांग जरा विठ्ठला तू त्या लपलेल्या पावसाला......
वाट पावसाची पाहे इथे ढेकळं वावरी
आहे अजून तोऱ्यात ऊनं रागीट शिवारी
माझ्या तना मना सोसवेना आता आतला ऊन्हाळा
सांग जरा विठ्ठला तू लपलेल्या पावसाला......
कळा गेली शिवाराची वाटे चिंता मना भारी
भक्त तुझ्या विश्वासाने चालतात पायी वारी
उभा कसा निश्चल तू का रे हात कमरेला
सांग जरा विठ्ठला तू लपलेल्या पावसाला......
चिंताग्रस्त शेतकरी त्याला आता कुठे थारा
झाले उद्विग्न हे मन पाहे भनानता वारा
कसा पिकविल राजा आता पोटाच्या पशाला
सांग जरा विठ्ठला तू त्या लपलेल्या पावसाला......
भास दुष्काळाचे सारे आता माझ्या मना भिववीते
तुझ्या पावलांच्या जवळी का बरं रे मन माझे घोटाळते
दयाघन नाव तुझे सांग ठेवले कशाला
सांग जरा विठ्ठला तू त्या लपलेल्या पावसाला......
पंढरीत होईलच मोठी आषाढी साजरी
भक्त परतून येईल मग जेव्हा त्याच्या घरी
सांग पाहिलच कसा भेगाळल्या वावराला
सांग जरा विठ्ठला तू त्या लपलेल्या पावसाला......
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #सांग_देवा_विठ्ठला