Nojoto: Largest Storytelling Platform

_#कवी'धनूज रोजचा एक बलात्कार, रोजची तीच बातमी.. जी

_#कवी'धनूज
रोजचा एक बलात्कार, रोजची तीच बातमी..
जीवंतपणी मेलेत शरीर कित्येक, निर्दयी, गलिच्छ नाती..
रक्ताचे पाणी झाले, झाली दिखाव्याची ख्याती..
वासनेचे पुजारी जमलेत, मेंदूच्या भोवती..
कुठली मैत्री, कुठली नाती,
लहान, थोर, ना तमा कोणत्या वयाची..
वासनाधीन नजरा लेऊनी, ओरबाडे शरीराचे काढती..
बलात्कार, बलात्कार, बलात्कार,
शब्द आमच्या अंगवळणी..
आज इथली बातमी, उद्या तिथली बातमी
चालायचं बोलूनी_ वेळ काढूनी नेती..
पायदळी तूडवूनी संस्कार,
मोठ्या दिमाखात वाचतो, ऐकतो आम्ही बलात्काराची बातमी..
कुठे पडतोय कमी, कुठे चुकतोय कोणी,
जबाबदारी नक्की कोणाची..
कोण थांबवणार, कोण बदलणार,
ही क्रूर कर्माची नाती..
जबाबदारी नक्की कोणाची.. जबाबदारी नक्की कोणाची..

©Dhananjay(dhanuj) Sankpal #जबाबदारी
#धनूज
#शायरी