Nojoto: Largest Storytelling Platform

हा अवखळ वारा झोंबे माझ्या पदराला गं बाई परतून घरी

हा अवखळ वारा झोंबे माझ्या पदराला गं बाई
परतून घरी बघ जाण्याची गं आहे मजला घाई
भेटून निघाले सजणाला मी उशीर आहे झाला
अंधार पसरला आणि घराचा रस्ता सोपा नाही

पाहते कुणी का मनात शंका हजार वेळा येते
नजरेस कुणाच्या नको पडाया अशी काळजी घेते
पण विचार त्याचा मनात येता लाली चढते गाली
इतक्यातच कुठली सखी कशी ती पुढ्यात माझ्या येते

पाहून लालसर गाल तिला गं थट्टा सुचते भारी
मग गोष्ट मला भेटीची लागे तिला सांगण्या सारी
घेऊन वचन मी तिच्याकडोनी निघे घरी जाण्याला
मज गोड वाटते प्रीती ही परि मनात भीती न्यारी

उंबऱ्यात येता पाय अडखळे पदर सावरुन येते
पाहत नाही ना मजला कोणी कानोसाही घेते
मी अलगद शिरते घरामधे अन रमते कामामध्ये
परि निजायची ती येता वेळा सखयाची सय येते

मज स्वप्नी भेटे साजण माझा चढे रंग प्रेमाला
आतुर हे होते माझे तनमन सखयाच्या मिलनाला
मग लाली चढते अलगद गाली समीप तो येताना
भासते मला सापडला आहे नवा अर्थ जगण्याला
--- १७/०३/२०२३ @ १६:५०

©उमा जोशी #नवा_अर्थ #भवानी #२/८/८/४