Nojoto: Largest Storytelling Platform

घट्ट घे लपेटून थंडी बोचरी आहे वाफाळल्या कपातील घोट

घट्ट घे लपेटून थंडी बोचरी आहे वाफाळल्या कपातील घोट जोवरी आहे..

इतकी तपासणी अन् या चौकशा कशाला? मांडले दुकान आता मजं कुठे नौकरी आहे?..

बिनधास्त सांगतो मी लपवले काहीच नाही माझा लढा युगांचा कारण भाकरी आहे..

वाढले केस ,दाढी नामकरण झाले छपरी भुंकतात श्र्वाने आता सोडली चाकरी आहे..

मातीत गांडूळांची पैदास खूप झाली करतो खुशाल सौदा द्रौपदी लक्तरी आहे..

पोखरतात तेच वासे घरातील पाळले भुंगे चालतो जपून तरीही का रोज ठोकरी आहे?..

जपले जरी पिलांना कवटाळून पंखाखाली उपरे मलाच घरटे सांज माझी ओसरी आहे..

कोण जपतो माणुसकीला? पाळतो मानवधर्म रंग सारे घाबरलेले त्यांची हाजरी आहे..

©Shankar Kamble #Light #गझल #मराठीकविता #मराठीप्रेम #मराठीविचार #मराठीसंस्कृति #मराठीलेखणी #मराठीकवी #धावा #प्रेमं