Nojoto: Largest Storytelling Platform

शकुनी प्रेमात वासनांचे, आज दर्प उतरले आहेत. बिभत

शकुनी 

प्रेमात वासनांचे, आज दर्प उतरले आहेत.
बिभत्स विकारी 'ते', संदर्भ उतरले आहेत.

सैल मिठी हाताची, झाली शय्येवरी सजावट
चिरडल्या 'गुलाबांचे', काही अर्थ उतरले आहेत ..

उमगले ना तयांना, पुणव चांदणे पिठुरी 
रोज तयांनी काटेरी, अवस भोगले आहे..

न द्या तयांना दाखले, मोरपंखी सावळ्याचे
ज्यांनी खोल मनात, शकुनी जपले आहेत ..

कवी :  निशांत तेंडोलकर .. #शकुनी
शकुनी 

प्रेमात वासनांचे, आज दर्प उतरले आहेत.
बिभत्स विकारी 'ते', संदर्भ उतरले आहेत.

सैल मिठी हाताची, झाली शय्येवरी सजावट
चिरडल्या 'गुलाबांचे', काही अर्थ उतरले आहेत ..

उमगले ना तयांना, पुणव चांदणे पिठुरी 
रोज तयांनी काटेरी, अवस भोगले आहे..

न द्या तयांना दाखले, मोरपंखी सावळ्याचे
ज्यांनी खोल मनात, शकुनी जपले आहेत ..

कवी :  निशांत तेंडोलकर .. #शकुनी