Nojoto: Largest Storytelling Platform

निसर्गाच्या जोरावर काळया आईची ओटी भरतो.. लाखोंचं

निसर्गाच्या  जोरावर
काळया आईची ओटी भरतो..
लाखोंचं कर्ज घेऊन 
माती मधला झूगार खेळतो..

सोन्यासारखा माल पिकवून 
 भाव मिळाला तर मिळतो ..
मनात कितीही दुःख असलं 
तरी आवंढा सारा गिळतो..

रोजी रोटीच्या संघर्षात 
आयुष्यभर दोन हाथ करतो..
मुलाबाळांच्या गरजेपोटी 
स्वतःला विसरून जातो..

ज्याचा बाप शेतकरी 
त्याला कवितेचा अर्थ कळतो..
कारण उभा जन्म बाप त्याचा
स्वप्न विसरून जीव जाळतो..

©गोरक्ष अशोक उंबरकर शेतकरी
निसर्गाच्या  जोरावर
काळया आईची ओटी भरतो..
लाखोंचं कर्ज घेऊन 
माती मधला झूगार खेळतो..

सोन्यासारखा माल पिकवून 
 भाव मिळाला तर मिळतो ..
मनात कितीही दुःख असलं 
तरी आवंढा सारा गिळतो..

रोजी रोटीच्या संघर्षात 
आयुष्यभर दोन हाथ करतो..
मुलाबाळांच्या गरजेपोटी 
स्वतःला विसरून जातो..

ज्याचा बाप शेतकरी 
त्याला कवितेचा अर्थ कळतो..
कारण उभा जन्म बाप त्याचा
स्वप्न विसरून जीव जाळतो..

©गोरक्ष अशोक उंबरकर शेतकरी