सगळेच लोक असतील खरे तसा हा काही स्वर्ग नाही, माणूस आहे की खेळणं मी कळायला काही मार्ग नाही..! भावनांचा तू खेळ केलास पण मी तर नेहमी खरा होतो, जवळ येण्याचं कारण काय म्हणे मी इतरांपेक्षा बरा होतो..! हृदयाचं मला माहित नाही पण कायम तुझ्या ओठांवर होतो, मोजून सांग मला आता मी कितव्या बोटावर होतो..! लिहणार होतो मी नवीन कथा या खोट्या जगात अपूर्ण राहिली, या ऋतूला काय दोश देऊ मी माणसं बदलताना पाहिली..! #माणसं बदलताना पाहिली..!