Nojoto: Largest Storytelling Platform

बिनधास्त व्यक्त व्हायला हवं... आयुष्य स्वतःचं आहे

बिनधास्त व्यक्त व्हायला हवं...
आयुष्य स्वतःचं आहे 
स्वतःला पटेल तसं जगायला हवं...
--प्रेरणा

(लेख👇) बऱ्याच दिवसांनी काल मैत्रिणीकडे गेले होते.आमच्या गप्पा सुरु झाल्या , गप्पांच्या ओघात माझं लक्ष तिच्या घरी असलेल्या त्या पिंजऱ्यातल्या पोपटाकडे गेलं.मला क्षणभर त्या पोपटाची दया आली कुणालाही येईल.तो पिंजरा म्हणजेच त्याचं आयुष्य जणू बनलं होतं. का कोण जाणे मलाही बरेचदा आपण स्वतः  त्या पिंजऱ्यातलं आयुष्य जगतोय असं वाटतं. सहजपणे कुणीतरी मनाला टाचणी टोचावी इतपत बोलून जातं  तेव्हा ढसाढसा रडावंस वाटतं परंतु रडलं की तुम्ही  मानसिकदृष्ट्या किती कमकुवत हे समजतात लोक.मग काय ? रडायचं नाही. मला अजूनही समजलं नाही जर डोळ्यांतून पाणी आलं तर काय हरकत आहे ? मनातल्या मनात मी माझ्या भावना का दडवून ठेवायच्या ? एखाद्या मृत शरीराला दफन करतात तसं ? नाही...नाही...! 
आई सांगायची पूर्वीचे लोक आपल्या सोनं नाण्यांवर कुणी डल्ला मारू नये म्हणून सर्व सोनं नाणं जमिनीत गाडायचे..मी भावना का गाडायच्या मनात आणि कुणासाठी? कुणाला फायदा होणार त्याचा ? लोकांना की मला ?
रडायचं नाही , ठीक आहे चला...पण मग उलटही बोलायचं नाही . खरंखुरं व्यक्त झालं की नाती तुटतात, मन ही तुटतंच हो त्याचं काय ? खोटं खोटं वागायला मी सेलिब्रिटी नाही किंवा मी कोणत्याही नाटक-सिनेमात काम करत नाही.मेल्यावर मला कुठला पुरस्कार मिळणार आहे का ? वाह..! वाह...! खूप छान नकली वागलीस तू असं म्हणून.
बरं आता कधी खूप जोरजोरात हसावसं वाटलं तरी हसायचं नाही, बेशिस्त आहे असंही लोक म्हणतात.मनातली किलमिश बाजूला सारून जरा आनंदी राहिलं तरीही लोकांना त्रास, अरे ही इतकी आनंदी कशी राहू शकते ? दुसऱ्याने आनंदात राहिलं तर त्या आनंदाचा त्रास का व्हावा?

सारांश असा आहे की पावलोपावली मला लोकांचा विचार करावा लागतो...का करायचा ? कशासाठी ? मी रोबोट आहे की माणूस आहे की पिंजऱ्यातला एक जीव ?  
--प्रेरणा
#yqtaai #yqkavyanand #yqmarathi #marathi #marathiwriter