Nojoto: Largest Storytelling Platform

दिवा... एक दिवा दिवसा जळत होता.. पण दिवसा कोणाला

दिवा...

एक दिवा दिवसा जळत होता..
पण दिवसा कोणाला कळत होता?
हा अलगद सूर्याची जागा घेत होता...
अन सूर्य तिकडे मावळत होता...

अंधार कधी झालाच नाही,
कधी सूर्य, कधी दिवा..
अंधाराला या जळत्या दिव्याचा..
वाटू लागला मोठा हेवा...

जो दिन रात्र जळला त्याचे,
मोल ना लोकां कळले..
कुणी ना कधी पूजले त्याला...
हृदय कुणाचे ना पाघळले...

अन एक दिवस थकून भागून,
भर दिवसा दिवा विझला..
कुणीच ना रडले त्यावर...
तो स्वतःच्याच अश्रूत भिजला...

नित्यक्रमाने त्या ही दिवशी,
सूर्यदेव गेले मावळतीला..
आमच्या नशिबी हा अंधार का..
सगळा गाव बोंबलला...

Vishaal/Aadinaath 
08-07-21








.

©Vishal Chavan #दिवा
दिवा...

एक दिवा दिवसा जळत होता..
पण दिवसा कोणाला कळत होता?
हा अलगद सूर्याची जागा घेत होता...
अन सूर्य तिकडे मावळत होता...

अंधार कधी झालाच नाही,
कधी सूर्य, कधी दिवा..
अंधाराला या जळत्या दिव्याचा..
वाटू लागला मोठा हेवा...

जो दिन रात्र जळला त्याचे,
मोल ना लोकां कळले..
कुणी ना कधी पूजले त्याला...
हृदय कुणाचे ना पाघळले...

अन एक दिवस थकून भागून,
भर दिवसा दिवा विझला..
कुणीच ना रडले त्यावर...
तो स्वतःच्याच अश्रूत भिजला...

नित्यक्रमाने त्या ही दिवशी,
सूर्यदेव गेले मावळतीला..
आमच्या नशिबी हा अंधार का..
सगळा गाव बोंबलला...

Vishaal/Aadinaath 
08-07-21








.

©Vishal Chavan #दिवा