हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही! चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!! जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे! मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!! ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा! आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही!! जाहली न कोणाची सांग राखरांगोळी! आपुलीच रांगोळी काढणे बरे नाही!! आज मोकळे बोलू! आज मोकळे होऊ! जीव एकमेकांचा जाळ्णे बरे नाही!! कालचा तुझामाझा चंद्र वेगळा होता! हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही!! मैफलीत या माझ्या पाहतेस का खाली! हाय...लाजणाऱ्याने जागणे बरे नाही!! - गझलकार सुरेश भट हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही! चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!! जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे! मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!!