प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं. प्रेमात आपल्या फक्त प्रेम असावं, प्रेमात तू माझ्यावर कधी ही रुसवा, अन अलगद येऊन मी तुला हसवाव, प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं. हृदयात तुझ्या नेहमी मीच असावं, तुझ्याच साठी माझे हृदय असावं. तुझ्याच सोबत माझं आयुष्य असावं. प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं. तुझ्या शिवाय माझं जीवन नसावं, प्रेमात आपल्या प्रेमाच गाव असावं प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं, नाव नसावं नाव नसावं. प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.