Nojoto: Largest Storytelling Platform

White एक कविता अपूर्णच राहिली....! पौर्णिमेच्या च

White एक कविता अपूर्णच राहिली....!

पौर्णिमेच्या चंद्रात अमावसेच्या अंधारात 
आज स्वतःच स्वतःला शोधतोय,
मनातील विचारांची काटेरी तलवार घेऊन 
मनातलं महायुद्ध  मनाशीच लढतोय..!
आत्ता हाती एक कागद एक लेखणी 
मनी विचारांची ओळ सजवली,
लिहायची म्हणता लिहू म्हणणारी 
एक कविता मात्र अपूर्ण राहिली....

आज लेखणी सोबत मनातील विचारांचे 
बोचरे काटे घेऊन लिहायचा बसलो,
कोरा कागद फक्त रचनेने भरलेला 
मनातले घाव फक्त मोजत बसलो..
खोलवरचे घाव भरता भरता 
मनाची उडालेली तारांबळ पहिली,
कोरा कागद कोराच राहिला 
एक कविता मात्र अपूर्ण राहिली....!

डोळ्यातून वाहणारी चंद्रभागा 
कोऱ्या कागदाला फक्त भिजवत होती,
धो धो कोळसाळणाऱ्या पावसात देखील 
चिंब भिजलेल्या घामाची ती एक सर होती...
प्रेम, मैत्री, कुटुंब की करिअर 
मनी मात्र विषयांची गर्दी पाहिली..
लेखणी कधीचं रुसून झोपलेली 
तिच्या इच्छेची कविता मात्र अपूर्ण राहिली....!

आत्ता मनाच्या कोपऱ्यात कविता नव्हती 
होते ते फक्त एकांतातले एकटेपण,
कितीतरी विषयांच्या विचारांच्या जाळ्यात 
अडकलेले ते एक भोळ अबोल मन...
अक्षरे शब्दात आणी शब्द ओळ विसरले 
लेखणी आणी कागदाची सांगड घालायची राहिली,
पाहिलेली स्वप्ने अजून स्वप्नात ठेवता 
आयुष्याची कविता मात्र अपूर्ण राहिली...
एक कविता अपूर्णच राहिली....! ❤️

         Pandhari Varpe 
          8698361992

©Varpe Pandhari #rainy_season
White एक कविता अपूर्णच राहिली....!

पौर्णिमेच्या चंद्रात अमावसेच्या अंधारात 
आज स्वतःच स्वतःला शोधतोय,
मनातील विचारांची काटेरी तलवार घेऊन 
मनातलं महायुद्ध  मनाशीच लढतोय..!
आत्ता हाती एक कागद एक लेखणी 
मनी विचारांची ओळ सजवली,
लिहायची म्हणता लिहू म्हणणारी 
एक कविता मात्र अपूर्ण राहिली....

आज लेखणी सोबत मनातील विचारांचे 
बोचरे काटे घेऊन लिहायचा बसलो,
कोरा कागद फक्त रचनेने भरलेला 
मनातले घाव फक्त मोजत बसलो..
खोलवरचे घाव भरता भरता 
मनाची उडालेली तारांबळ पहिली,
कोरा कागद कोराच राहिला 
एक कविता मात्र अपूर्ण राहिली....!

डोळ्यातून वाहणारी चंद्रभागा 
कोऱ्या कागदाला फक्त भिजवत होती,
धो धो कोळसाळणाऱ्या पावसात देखील 
चिंब भिजलेल्या घामाची ती एक सर होती...
प्रेम, मैत्री, कुटुंब की करिअर 
मनी मात्र विषयांची गर्दी पाहिली..
लेखणी कधीचं रुसून झोपलेली 
तिच्या इच्छेची कविता मात्र अपूर्ण राहिली....!

आत्ता मनाच्या कोपऱ्यात कविता नव्हती 
होते ते फक्त एकांतातले एकटेपण,
कितीतरी विषयांच्या विचारांच्या जाळ्यात 
अडकलेले ते एक भोळ अबोल मन...
अक्षरे शब्दात आणी शब्द ओळ विसरले 
लेखणी आणी कागदाची सांगड घालायची राहिली,
पाहिलेली स्वप्ने अजून स्वप्नात ठेवता 
आयुष्याची कविता मात्र अपूर्ण राहिली...
एक कविता अपूर्णच राहिली....! ❤️

         Pandhari Varpe 
          8698361992

©Varpe Pandhari #rainy_season