विजय आणि पराजय म्हटलं तर हाय, म्हटलं तर नाय विजय असो वा पराजय त्यात काय! हवा असतो दोघांनाही विकास तुम्हीच सांगा बरोबर हाय का नाय ? भेट आपली रोज होणारच गड्या गरज मलाही तुलाही वेळेला हवीच हाय म्हणून दोस्ता पहिल्या सारखं हसायचं राजकारण तेवढ्या पुरत पटत का नाय मैत्री आपली आयुष्यभर राहील विजयी झालो म्हणून हवेत जाणार नाय खात्री ठेव पुन्हा मी लढणार पराजय झाला तरी खचून जाणार नाय आनंदानं जगूया आपण सोबत नाही ओढायचे एकमेकांचे उगाच पाय चुका तर दाखवायच्या नक्कीच पंगतीत बसायला मात्र लाजायच नाय सुख दुःखाला साथ देऊ हात देऊ तुझं माझं करतं आता बसायचं नाय गाव आपलं कुटुंबासारख ठेवू नात्याला जपू जशी दुधावरची साय म्हटलं तर हाय, म्हटलं तर नाय विजय असो वा पराजय त्यात काय! हवा असतो दोघांनाही विकास तुम्हीच सांगा बरोबर हाय का नाय ? कवी गीतकार पंडित निंबाळकर मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहमदनगर ७९७२५२३७१७ ©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar #poem #rajkaran